पन्हाळा पंचायती समोर मनसेचा जाळ आणि धूर संगट... शालेय गणवेश व पाठीवर दफ्तर घेऊन कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन







पन्हाळा :  पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्र शाळेची इमारत गेले कित्येक महिने धोकादायक अवस्थेत असून तेथील बाल विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर उन्हात बसवले जाते. यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर झालेल्या विलंबास, व तात्काळ नवीन खोल्या निधी उपलब्ध करण्यासंदर्भात *पन्हाळा मनसे तालुकाध्यक्ष विशाल मोरे यांच्या नेतृत्वाखाली* पंचायत समिती, पन्हाळा समोर अनोखे असे शालेय गणवेशात बोंब मारो, आंदोलन घेण्यात आले. यावेळी 2019 पासून कसा गलथान कारभार चालू आहे हा प्रश्न चव्हाट्यावर आणण्यात आला. दीड वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्लेखन आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी का झाली नाही याचा जाब विचारण्यात आला. प्रश्नांची सरबत्ती चालू झाल्यानंतर घाम फुटलेले गट विकास अधिकारी तुळशीदास शिंदे व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शिष्टमंडळास अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर तातडीने त्याची प्रत जिल्हा परिषदेकडे पाठवली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले... 

या *अनोख्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील,तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड,अमर बचाटे, तालुका सचिव लखन लादे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सनी लोखंडे,रोजगार सेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश मेनकर, कळे पंचायत समिती विभाग प्रमुख रविंन्द्र पाटील, उपविभाग प्रमुख लक्ष्मण पाटील, कळे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सतीश कुंभार,चित्रपट सेनेचे जिल्हा सचिव रोहित मिटके उपाध्यक्ष राहुल भाट, कोडोली शहर उपाध्यक्ष अक्षय बुगले, अक्षय बुगले महाराष्ट्र सैनिक विशाल कांबळे,  पन्हाळा तालुक्यातील तमाम मनसैनिक उपस्थित होते.*




Post a Comment

Previous Post Next Post