ऍमेझॉन कंपनीच्या भारतातील व्यवहारावर बंदी घालावी अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने केली आहे.



 नवी दिल्ली - ऍमेझॉन कंपनी भारतात व्यवहार करताना अवैध मार्गाचा अवलंब करीत आहे. त्यामुळे या कंपनीच्या भारतातील व्यवहारावर बंदी घालावी अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने केली आहे.या संघटनेचे महासंचालक प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, चुकीच्या मार्गाचा अवलंब करून ऍमेझॉन कंपनी ग्राहकांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी अयोग्य सूट आणि सवलती दिल्या जातात. त्यामुळे इतर व्यापाऱ्याचे नुकसान होते.

या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी होण्याची गरज आहे. या कंपनीकडून परकीय गुंतवणूक कायद्यातील तरतुदीचा भंग करण्यात येत आहे, असे खंडेलवाल म्हणाले. व्यापारी संघटनेने या बाबी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून कळविल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post