दशलक्ष पर्वानिमित्त क्षमा धर्म या विषयावर व्याख्यानमाला संपन्न. (हातकणंगले तालुका प्रतिनिधी - - आप्पासाहेब भोसले)   


मानवी जीवनात अनेक कारणांमुळे   त्रागा निर्माण होतो. िर्माण होणार्‍या  त्र्यागामुळे मनात वितुष्ट निर्माण होते . अशा वेळी समंजसपणा दाखवून मन मोठे केल्यास  द्वेष  निर्माण होणार नाही. एकात्मिकता टिकून राहते. क्षमा करन्यामुळे  आपसात आपुलकी टिकून राहण्यासाठी मदत होते . ते  केल्यास समाजात समाधान नांदेल. असे प्रतिपादन सुरेखा मोटके पाटील यांनी व्यक्त केले .                 येथील कुंभोजे मळा महावीर दिगंबरजैन मंदिरमध्ये वीर महिला मंडळ व वीर सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने दशलक्षण पर्वानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत "क्षमा धर्म" या विषयावर मोटके पाटील बोलत होत्या .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुचेता कलाजे होत्या .

               नमोकार मंत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वागत सुवर्णा कल्याणी यांनी केले. यावेळी वीर सेवा दलाचे जिल्हा संघटक सुरेश मालगावे, जीन मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुरेश कुंभोजे, जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाशअकिवाटे ,घन :शाम कुंभार यांच्यासह श्रावक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती देसाई यांनी केले. सविता कुंभोजे यांनी आभार मानले. जिनवाणी स्तुतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

       समाजामध्ये वावरताना एकमेका बद्दल आपुलकी निर्माण व्हावी. कोणत्याही प्रकारचा गर्व न करता  दिखाऊ पणा पेक्षा  आपले अंत:करण  निर्मळ व स्वच्छ असावे.यामुळे नात्यांमध्ये  मार्दवपणा निर्माण होतो. यामुळेच  एकमेकांशी चांगले संबंध रुजले जातात असे प्रतिपादन  बालब्रम्हचारी संजय गोपलकर यांनी केले. 

          येथील कुंभोज मळा जीन मंदिर मध्ये वीर महिला मंडळ व वीर सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत" मार्दव धर्म" या विषयावर गोपळकर बोलत होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शांतिनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील होते .

          दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .स्वागत व प्रास्ताविक कल्याणी सर यांनी केले. यावेळी संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले .यावेळी महावीर पाटील ,जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश आकिवाटे,  घनश्याम कुंभार ,  वीर सेवादल जिल्हा संघटक सुरेश मालगावे, शोभा पाटील, कुसुम पाटील ,सुरेश कुंभोजे, प्रकाश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती देसाई यांनी केले .आप्पासो पाटील यांनी आभार मानले .

Post a comment

0 Comments