खराब झालेल्या काळ्या ऑईलवर प्रक्रिया करून ते नामांकित कंपनीच्या नावे नागरिकांना विकण्याचा सुरू असलेला काळाबाजार आर्थिक गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाने केला उद्ध्वस्तखराब झालेल्या काळ्या ऑईलवर प्रक्रिया करून ते नामांकित कंपनीच्या नावे नागरिकांना विकण्याचा सुरू असलेला काळाबाजार आर्थिक गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाने उद्ध्वस्त केला. या पथकाने कूर्ला पश्चिमेला छापा टाकून 70 ड्रममध्ये भरून ठेवलेले 14 हजार 700 लिटर काळे आईल जप्त केले.

कूर्ला पश्चिमेकडील क्रांती नगरात असलेल्या बीएमके कंपाऊंडमध्ये एका गोदामात खराब झालेल्या काळय़ा तेलाचा काळाबाजार सुरू असल्याची खबर नियंत्रण कक्षाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी एपीआय वंगगाटे तसेच गणेश डोईपह्डे, वलेकर, कोळी, विशाल यादव, दरेकर यांच्यासह त्या तेव्हा तेथे 11 लाख 36 हजार किमतीचे काळे ऑईल सापडले. हा काळाबाजार करणारे रामजी गौतम आणि रामदुलार पासी या दोघांना अटक करण्यात आली. तर गोदाम मालक नाझिर खान आणि रमेश सोनी हे दोघे फरार झाले. आरोपी विविध ठिकाणाहून खराब झालेले टाकाऊ काळे ऑईल जमा करून आणायचे. मग त्या ऑईलवर प्रक्रिया करून ते ऑईल नामांकित कंपनीच्या नावाने नागरिकांना विपून त्यांची फसवणूक करायचे. चांगले ऑईल समजून नागरिक मोठय़ा किमतीत घेतात, परंतु त्यांचे पैसे जातात त्याच बरोबर गाडय़ांच्या इंजिनची देखील वाट लागते, असे सांगण्यात आले. .

Post a comment

0 Comments