मराठी गझलेने एक उत्तम शेर गमावला इलाही जमादार यांच्या निधनावर प्रसाद कुलकर्णी यांची प्रतिक्रिया


 

इचलकरंजी ता.३१ ,इलाही जमादार यांच्या निधनाने विद्यमान मराठी गझलेने एक शेर आज गमावला आहे..फार मोठा गझलकार आणि अतिशय उत्तम माणूस गेल.मागच्याच आठवड्यात डॉ. संजीवनीजी तोफखाने त्यांना बघून आल्या होत्या.त्यावेळी त्यांचे माझे फोनवर बोलणे झाले होते. आम्ही सर्व गझलसाद ,कोल्हापूर समूहाला घेऊन इलाहीजीना भेटायला  जायचेही ठरवले होते.पण ते होऊ शकले नाही. ही आयुष्यभर सतावत राहील अशी खंत राहील.त्यांना आदरांजली वाहणारी सभा गझलसाद च्या वतीने बुधवार ता. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी, सुभाष नागेशकर यांचा बांगला,साईक्स एक्सटेंशन ,कोल्हापूर अशी भावना ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी ( इचलकरंजी ) यांनी व्यक्त केली.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,मराठीतील एक थोर,प्रतिभावंत,प्रयोगशील गझलकार कालवश झाला आहे.मराठी गझल विश्वाची फार मोठी हानी झाली आहे. माझा एक सदैव चर्चेचा तयार असणारा,अनेक मुशायऱ्यात,कार्यक्रमात ज्येष्ठ म्हणून बरोबर असणारा,आणि वयात अंतर असूनही एकेरी नावाने मैत्र असणारा माझा १९८६ पासूनचा गझलमित्र गमावला आहे. गझलविचारांबाबत काही वेगळी मते असली,भूमिका असल्या तरी त्याचा आदर करणारा ,मतभेद असले तरी मनभेद न मानणारा एक फार उत्तम माणूस व श्रेष्ठ गझलकार आपण आज गमावला आहे.या थोर शायराला  माझी व्यक्तिगत ,कौटुंबिक आणि  गझलसाद, कोल्हापूर  परिवाराची विनम्र आदरांजली...इलाही तुमच्या जाण्याची जखम सुगंधी नाही तर ती काळजात खोल वार करणारी आहे....पण तुमची गझल मराठी गझलविश्वात नेहमीच सुगंधित राहील यात शंका नाही...तुमचा गझल मोगरा अक्षय दरवळत राहील कारण तुमचा वारही मोगऱ्याचा असायचा.मराठी गझलेतील या उत्तम शेराला पुनश्च एकदा विनम्र अभिवादन.

Post a Comment

Previous Post Next Post