प्राध्यापकाने सोडलीया लाज; कोणास ठाऊक त्याला आलाय कसला माज।

 


  शिरोळ (तालुका प्रतिनिधी) : 

 शिरोळ तालुक्यातील एका प्रसिद्ध अशा महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने कोणीतरी एखादा शेजारी आपल्या दारात गटारीचे घाण पाणी सोडतो म्हणून त्या पाणी सोडणाऱ्या शेजाऱ्यास सोडून काहीही सम्बन्ध नसणाऱ्या शेजाऱ्याच्या दारात शौचालयाचे पाणी सोडून हकनाक त्या शेजाऱ्यास त्रास देण्याचा उपद्रव चालविला आहे. घाणीच्या वासाने त्रास होऊन आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने त्या शेजाऱ्याने ग्रामपंचायतिकडे तक्रार देखील केली. पण निवडणुका तोंडावर असल्याने त्यावेळी ग्रापच्या पदाधिकाऱ्यानी पूर्णतः दुर्लक्ष केले. आता मात्र प्रश्न खूपच गंभीर होतो आहे. पण प्राध्यापक महाशय कुठे तक्रार करायची आहे तिथे करा. असा पवित्रा घेत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा अजब पवित्रा या अवलंबीला आहे. करणार कुणी आणि भरणार कोण ?  असा प्रसंग आता उभा राहिला आहे. अशा अजब प्राध्यापकांची नियुक्ती प्राचार्य पदी देखील झाली होती. पण ते एक दिवसाच्या वर त्या खुर्चीवर टिकू शकले नाहीत. का कोणास ठाऊक?

Post a comment

0 Comments