धैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजपचेच उपस्थित जास्त कार्यकर्ते, धैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, शिवसेना-भाजपची जवळीक?

 इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ खासदार धैर्यशील माने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ खासदार धैर्यशील माने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला धैर्यशील मानेंसह माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश हळवणकर,  नगराध्यक्षा ॲड अलका स्वामी, अशोक स्वामी,मदन कांरडे रवींद्र माने, हरिष बोहरा, महादेव गौड उपस्थित होते.

शिवसेनेच्या माजी आमदारासह भाजप कार्यकर्ते

सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे शहरात दिवसभर या गोष्टीची चर्चा रंगली होती.

Post a comment

0 Comments