*भारत निर्माण पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी यांचा माणुसकी फाउंडेशन च्या वतीने केक कापून निषेध व्यक्त करण्यात आला
हातकणंगले प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले   

माणुसकी फाउंडेशन च्या वतीने गेली दीड वर्षे भारत निर्माण पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी यांचा भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरुद्ध आंदोलन सुरु असून  या आंदोलनादरम्यान 26 जानेवारी 2020 ला गाव सभेत असा ठराव झाला होता की चंद्रकांत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी ऑडीट नेमून करण्यात यावे पण गेले एक वर्ष आज पूर्ण होणे कोणतेही ऑडिट नेमणूक झाली नसल्याने त्याचबरोबर मध्यंतरी अनेक तीव्र आंदोलन होऊनही अध्यक्ष व सचिव यांनी जाणीवपूर्वक काही राजकीय लोकांच्या दबावाने व काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी ऑडिट करून घेणे गरजेचे असतानाही ही त्यांनी गावाच्या सभेला ठरावाला केराची टोपली दाखवत हा लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे तसेच भारत निर्माण चे सध्याचे विज बिल 95 लाख रुपये थकीत असून भविष्यात पाणीपुरवठा योजनाही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने तारदाळ खोतवाडी येथील लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच अनुषंगाने माणुसकी फाउंडेशन तारदाळ खोतवाडी यांच्यावतीने खोतवाडी ग्रामपंचायत येथे  गांधीगिरी पद्धतीने केक कापून भारत निर्माण पाणीपुरवठा कमिटीचा व त्यांना मदत राजकीय नेत्यांच्या जाहीर निषेध करण्यात आला व भविष्यात तीव्र  आंदोलन करण्याचा प्रविण केर्ले यांनी इशारा देण्यात आला

यावेळी माणुसकी फाऊंडेशनचे प्रविण केर्ले,शिवाजी भुयेकर,विशाल पोवार,सुनिल यमगर, अजय माने,वैभव बुचडे,सुरज कांबळे,विशाल चौगुले,काशिनाथ एडके, 

सुयश नांगरे,बबलू पाटील व माणुसकी फाऊंडेशनचे सद्यस्य उपस्थित होते

(Co चे हातकणंगले चे गटविकास अधिकारी यांना 22 डिसेंबरला ऑडिट संदर्भात लेटर येऊनही अद्याप ही त्यांनी दोन्ही ग्रामपंचायत काढणे त्यांच्या भूमिकेविषयी संशयास्पद वाटत आहे )

Post a comment

0 Comments