पुणेः आदर्श पत्रकार महासंघ.

कोरोनामुळे पत्रकारांचे भवितव्य चिंतनीय..  मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार... आदर्श पत्रकार महासंघ.


PRESS MEDIA LIVE :

जाहिरातींअभावी दैनिकांची आर्थिक स्थिती कोलमडत असल्याच्या कारणावरुन सर्वच वृत्तपत्र व्यवस्थापनांनी जवळपास 30 ते 40 टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून  ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचणार आहे त्यांच्या पगारात 40 टक्के कपात केली जाणार आहे. जोपर्यंत जाहिरातींची स्थिती पूर्वपदावर येणार नाही तोपर्यंत त्यांना पूर्ववत पगार मिळणार नाही, अशी अवस्था आहे. खर्च आटोक्यात आणण्यासाठी काही दैनिकांची संपर्क आणि विभागीय कार्यालयेही बंद केली जाणार आहेत. काहींनी त्याच्या अंमलबजावणीस सुरुवातही केली आहे. यामुळे अनेक पत्रकारांची अवस्था बिकट होणार असून अनेकांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. याबाबत आता विचार करण्याची गरज आहे. तसेच साप्ताहिक आणि मासिकांना जाहिराती मिळणे दुरापस्त होणार आहे त्यामुळे त्यांची अवस्था वाईट होणार आहे. परिणामी मदतीसाठी  सरकारकडे दाद मागण्याची गरज आहे.  या बाबत आदर्श पत्रकार महासंघ महाराष्ट्र तर्फे मुख्यमंत्री याने निवेदन देण्यात येणार आहे.

Post a comment

0 Comments