पुणे सह पिंपरी चिंचवड पुन्हा .....

सोमवार पासून पुणे सह पिंपरी चिंचवड लॉक डाउन पुन्हा होणार.


PRESS MEDIA LIVE :   पुणे : (मोहम्मद जावेद मौला) :

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात दिवसें दिवस करोनाची संख्या वाढताना दिसत आहे. करोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. येत्या सोमवारपासून (दि.१३) पुणे , पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हे लॉकडाऊन १३ ते २३ या दरम्यान असणार आहे. त्याचबरोबर या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद असणार आहे. विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याबैठकीमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

मागील आठवड्यातच पवार यांनी करोनाची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी प्रशासनाला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस प्रशासनाने दुकाने वेळेत बंद करणे, अनावश्‍यक फिरणाऱ्यांवर कारवाई करणे , मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करणे, आदी कारवाई केली. तरीसुध्दा करोनाची संख्या वाढत राहिली, यासर्व बाबींची पवार यांनी दखल घेत सरतेशेवटी लॉकडाऊन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post