प्रेस मीडिया लाईव्ह :
.महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केली जात असून पुण्यातही तीन महत्त्वाच्या ठिकाणी ही सुरक्षा कवायत होणार आहे. पुणे शहरात तीन ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यात विधान भवन, तळेगाव सीआरपीएफ कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयाचा समावेश आहे. या तीन ठिकाणी उद्या मॉकड्रिल होणार आहे. विधान भवन या ठिकाणी मॉक ड्रिल होणार असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कवायतीची माहिती दिली.
पुण्यातील मॉक ड्रीलबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एक मीटिंग झाली. त्यानुसार उद्या संध्याकाळी चार वाजता पुणे विधान भवन येथे मॉक ड्रिल होणार आहे. ग्रामीण भागातही मॉक ड्रिल होणार असून सर्व विभागांचा यामध्ये समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉक ड्रिलचा उद्देश भविष्यात काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर आपली तयारी असावी हा आहे. शहराती तीन ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. यादरम्यान सायरन वाजवले जातील आणि या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जाणार आहे. यासंदर्भातील यत्रणांची आज चाचणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. हे मॉक ड्रिल आपण सुरक्षा, काळजी म्हणून घेत आहोत. विधान भवन येथील माँक ड्रिलमध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. पुण्यात तिन्ही ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल होणार आहे. जवळपास तीन तास मॉक ड्रिल चालेल अशी माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच आर्मी, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग ,पोलीसही यामध्ये असेल असे त्यांनी सांगितले.
मॉक ड्रिलमध्ये काय होणार...?
हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जाणार
नागरिक आणि विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार
संबंधीत परिसरात वीज बंद करून ब्लॅक आउटसाठीची तयारी करणार
महत्त्वाच्या सुविधा अन् कृती लपवून ठेवण्याचा सराव केला जाणार
सायरन वाजल्यास काय करावे?
तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा: 5-10 मिनिटांत जवळच्या सुरक्षित आश्रयस्थळी पोहोचा.
घाबरू नका: सायरन ऐकून पॅनिक होऊ नका, शांतपणे सूचनांचे पालन करा.
मोकळ्या जागेपासून दूर राहा: उघड्या मैदानांवर थांबू नका.
इमारतीत प्रवेश: घर किंवा सुरक्षित इमारतीच्या आत जा.
माहितीचे स्रोत: टीव्ही, रेडिओ आणि सरकारी अलर्ट्सवर लक्ष ठेवा.
अफवांवर विश्वास ठेवू नका: फक्त प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा.