प्रेस मीडिया लाईव्ह :
युनुस लाडखान :
जयसिंगपूर :येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेच्या चेअरमनपदी संतोष ईश्वरा कोळी (दानोळी) तर व्हा.चेअरमनपदी ज्योत्स्ना अमितकुमार कटकोळे (शिरोळ)यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी अधिकारी श्रेणी १अधिन जिल्हा उपनिबंधक कार्यालय, कोल्हापूरचे एन.ए.माने हे होते. निवडीनंतर उपस्थितांनी नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.मावळते चेअरमन कुमार सिदनाळे,व्हा.चेअरमन प्रकाश पुजारी यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनिल एडके,प्रकाश खोत,महेशकुमार देशमुख,सुदर्शन कोळी,महंमदहनिफ मुल्ला,विजय भोसले,रईसअहमद पटेल,मेहबूब मुजावर,पी.के.कांबळे,सुनिल कळसापन्नावर,संतोष जुगळे,उदय भोसले,संतोष भोसले,राहूल माळी,सुर्यकांत कोडोले,चंद्रकांत कोरे,प्रितम गवंडी,बाजीराव कोळी,संतोष ठोमके,दिलीप दुधाळे, अमर दुधाळे,कुबेर गावडे,रमजान पाथरवट,अनिल कोळी,किरण पाटील, विलास चव्हाण,सुहास कोळी,जितेंद्र वसगडेकर,संकेत गायकवाड यांच्यासह संचालक,कर्मचारी वृंद उपस्थित होते.