अनेक दहशतवादी तळ भारतीय सेनेने केले उद्ध्वस्त शंभरहून अधिक दहशतवादी ठार भारताची मोठी कारवाई. तर दहशतवादी मसूद अझहर चे या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. :- पहलगाम येथील निष्पाप लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारल्याने संपूर्ण भारतात याबाबत पाकिस्तानला धडा शिकवा असे प्रतिक्रिया उमटले होते याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी यांचा उत्तर चोखपणे दिले जाईल असे म्हटले होते आणी मध्यरात्री भारतीय जवानांनी रात्री १:३० च्या दरम्यान एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणी हल्ला चढवला यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे माहीती भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेविरुद्ध भारताने चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी जगाला सांगितली. भारतीय सैन्याच्या वतीने कर्नल सोफिया कुरेशी, महिला अधिकारी व्योमिका आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पत्रकार परिषदेद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली.पाकिस्तानी दहशतवादी संघटनेविरुद्ध भारताने चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी काही वेळापूर्वीच जगाला सांगितली. भारतीय सैन्याच्या वतीने कर्नल सोफिया कुरेशी, महिला अधिकारी व्योमिका आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पत्रकार परिषदेद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली. दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करून भारताने जगाला महिला शक्तीचा संदेश दिला आहे आणि त्यासोबतच भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संकेतही दिले आहेत. पण या पत्रकार परिषदेनंतर सोफिया कुरेशी कोण आहेत, याबाबत आता उत्सुकतेने विचारले जात आहे.
कोण आहेत लेफ्टनंट कर्नल कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. सोफिया सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव ‘एक्सरसाइज फोर्स १८’ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत.
१८ देशांच्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारताच्या बाजूचे नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाल्यावर त्य प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यावेळी, कोणत्याही देशाच्या लष्करी तुकडीचे नेतृत्व करणारी ती एकमेव महिला ठरल्या. त्यांनी ४० सैनिकांच्या भारतीय पथकाचे नेतृत्व केले.
३५ वर्षीय सोफिया कुरेशी ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदाची अधिकारी आहेत. त्यांनी सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा बजावली असून त्या मुळच्या गुजरातमधील वडोदरा येथील आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोफिया कुरेशी १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. सोफिया कुरेशीचे आजोबाही सैन्यात होते. सोफियाचा नवरा मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर आहे.
मार्च २०१६ मध्ये, सोफिया कुरेशी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात लष्करी तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनली. ‘एक्सरसाइज फोर्स १८’ हा प्रशिक्षण सराव हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव आहे. या सरावात भारत, जपान, चीन, रशिया, अमेरिका, कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह आसियान (आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना) चे सदस्य सहभागी झाले होते. ते पुणे, भारतातील येथे आयोजित करण्यात आले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे दहशतवादी मसूद अझहरने एक पत्र जारी करून, त्यालाही या हल्ल्यात मारलं असतं तर बरं झालं असतं” असे म्हटले आहे. भारताने ऑपरेशन सिंदुर द्वारे एअर स्ट्राईक हवाई हल्ला केल्याने पाकिस्तानचे दाबेदणानुन गेले आहे .