प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरढोण गावचे सुपुत्र शिरढोण विविध सेवा सोसायटीचे आधारस्तंभ लक्ष्मी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिक्षण क्षेत्रातील पूर्वीचे प्रख्यात शिक्षक गुरुजी म्हणून प्रामाणिकपणे मुलांना शिक्षणाचे संस्कार दिले त्यांना शिक्षणामुळे मुले विद्यार्थी मोठ्या पदावर आज काम करीत आहेत असे शिक्षण प्रेमी शिक्षक गुरुजी माननीय श्री परशुराम गुरवानगुरुजी यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांची मुलगी अमृता विशाल गंध राहणार पनवेल मुंबई यांचाही वाढदिवस आजच असल्यामुळे हा संयुक्त कार्यक्रम गुरुदत्त साखर कारखान्या समोर सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ श्रावण बाळ वर्धा आश्रम येथे भव्य मोठ्या दिमाखात केक कापून साजरा करण्यात आला .
यानिमित्त आश्रम मधील नागरिकांना कपडे व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात देण्यात आले या निमित्ताने हा कार्यक्रम आज शनिवार दिनांक 24 5 20 25 रोजी सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी खास पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संतोष आठवले सर हे उपस्थित होते त्याचबरोबर गुरुजींचे जावई अण्णासो पाटील प्रगतशील शेतकरी त्यांचे सुपुत्र राजीव गुरवान, वर्धा आश्रम चे संचालिका शोभाताई पानदारे यांनी स्वागत केले व संस्थेचे अध्यक्ष सुरेश सासणे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी शिरोळ तालुक्यातील शेतमजूर संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद