प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली प्रतिनिधी : अशोक मासाळ
दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित आर एम हायस्कूल मिरज चे मुख्याध्यापक श्री सुरेश वनमोरे सर यांना आदर्श सभासद शिक्षण सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षण सेवक सहकार सोसायटी लिमिटेड सांगली च्या वतीने आज दिनांक 10 -5 -2025 रोजी विलिंग्डन महाविद्यालय सांगली वेलणकर हॉल या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
शिक्षण सेवक सोसायटीचा सभासद म्हणून गेली अनेक वर्षे ते संस्थेवर प्रेम करीत होते शिक्षण क्षेत्राची सेवा अत्यंत मनोभावी करत आहात विविध क्षेत्रातील आपला खारीचा वाटा आहे ही बाब नव्या पिढी ला प्रेरणादायी आहे म्हणूनच आपणाला शिक्षण सेवक सहकार सोसायटी लिमिटेड सांगली च्या वतीने आदर्श सभासद शिक्षण सेवक पुरस्कार आपणास देण्यात आला आहे.
यावेळी हा पुरस्कार पुणे शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर, शिक्षण सेवक सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ ,सर्व शाखांचे पदाधिकारी, सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.
त्यांच्या या सन्मानाने सांगली जिल्हा, मिरज ,कुपवाड ,या क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.