प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
१० मे हा कैफीआझमीयांचास्मृतिदिन.' इतना तो जिंदगी में किसी को खलाल पडे ' अशी पहिली रचना वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी करणारे कैफी आझमी हे एक महान शायर होते,कवी होते अख्तर हुसेन रिझवी होते.कैफी हे त्यांचे टोपणनाव होते. १४ जानेवारी १९१९ उत्तर प्रदेशातील अझमगड जिल्ह्यातील मिझवा या गावी एका जमीनदार कुटुंबात यांचा जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते तसेच पुरोगामी लेखक संघातही कार्यरत होते .कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी कानपूर, मुंबई येथे गिरणी कामगारात काम केले . कौमी जंग हे पक्षाचे मुखपत्र ही ते चालवीत.अनेक कविता संग्रह त्यांच्या नावावर आहेत. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर गीतकार म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. सामाजिक दुःखांना वाचा फोडणाऱ्या अनेक गीतांची निर्मिती त्यांनी केली. अनेक चित्रपटांचे संवाद लेखन, कथालेखन ही त्यांनी केले होते.
नाट्य व चित्रपट अभिनेत्री शौकत कैफ या त्यांच्या पत्नी होत्या. तर
अभिनेत्री शबाना आझमी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी ही त्यांची अपत्ये.. हा महान शायर वयाच्या ८३ व्या वर्षी १० मे २००२ रोजी निधन पावला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन १९७४ साली गौरवले होते. १९७५ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार १९७० साली त्यांना मिळालेला होता.तसेच सोवियत लँडसह
इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
कैफी यांच्या काही लोकप्रिय रचना पुढील प्रमाणे,
कर चले हम फिदा जान ओ तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो !
झुकी झुकी सी नजर बेकरार है की नही
दबा दबा सा सही दिल में प्यार हाय की नही!
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो?
आखो मे नमी हसी लबो पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो !
शोर यु ही न परिंदो ने मचाया होगा
कोई जंगल की तरफ शहर से आया होगा !
मै धुंडता हू जिसे वो जहा नही मिलता
नाही जमीन नया आसमानही मिलता !
खडा हू कब से मै चेहरों के एक जंगल मे
तुम्हारे चेहरे का कुछ यहा नही मिलता!
वक्त ने किया क्या हसी सितम
तुम रहे ना तुम हम रहे ना हम !
तुम जो मिल गये हो तो ये लगता है के जहा मिल गया
एक भटके हुए राही को कारवा मिल गया !
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
जहर चुपके से दवा जान के खाया होगा !
ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही
किस को सुनाऊ हाल दिल ए बेकरार का
बुझता हुआ चराब हू अपनी मजारका
ए काश भूल जाऊ मगर भुलता नही
किस धूम से उठाया जनाजा बहारका !
चलते चलते युही कोई मिल गया था !
अशी असंख्य आजरामर गीते गझला कविता लिहिणाऱ्या कैफी आजमी यांना विनम्र अभिवादन....!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.