प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोंढव्यात राहणाऱ्या एका युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब येताच, आहे.खतिजा शहाबुद्दीन शेख (१९, रा. कौसरबाग, ईशा लरीयल, कोंढवा) असे युवतीचे नाव आहे.
सकल हिंदू समाजाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहीत होती. तिने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी म्हंटले की, ' या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासाला सुरुवात झाली आहे.' या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.