प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : आज सांगली येथील जातपडताळणी विभागीय कार्यालय मध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी ऑर्गनायझेशन सांगली जिल्हा यांच्या वतीने जातपडताळणी समिती अध्यक्षा श्रीमती प्रतिभा इंगळे यांना समक्ष भेटून जात पडताळणीचे दाखले त्वरित मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी अर्जदारांना अनाअवश्यक कागदपत्रांची मागणी करू नये व शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व त्यांच्या शासन परिपत्रका प्रमाणे दाखले देण्यात यावे आणि चुकीचे व बोगस दाखले देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली व औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठाणे दिलेल्या निकालानुसार जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी कोणतेही कारणाशिवाय व कधीही दाखला देण्यात यावा अशा निर्णयानुसार दाखले देण्यात यावे अशी महत्वाची मागणी करण्यात आली. तसेच झालेल्या चर्चेनुसार सर्व दाखले विना विलंब लवकरात लवकर देऊ व विद्यार्थांची गैरसोय टाळू असे आश्वासन जातपडताळणी समिती अध्यक्षानी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, प्रदेश समन्वयक नासिर शरीकमसलत, मनपा क्षेत्र अध्यक्ष जाकीर शरीकमसलत, सांगली शहर अध्यक्ष सुहेल बलबंड, मनपा क्षेत्र कार्याध्यक्ष अकबर शेख, आसिफ अत्तार आदी उपस्थित होते.*