उमेहबीबा आरकाटे प्रथम,इहान आरकाटे द्वितीय,तनुश्री आळते तृतीय
प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड:प्रतिनिधी :
येथील श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्यु.काॅलेजचा इ.१० वी चा निकाल ९३.१० टक्के लागला असून सेमी इंग्रजीचा निकाल १०० टक्के लागला आहे या मध्ये कु. उमेहबीबा जमीर आरकाटे हिने ९३.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,चि.इहान समीर आरकाटे ह्याने ९२.२० टक्के गुण मिळवून व्दितिय क्रमांक तर कु.तनुश्री शितल आळते हिने ९१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
विशेष प्राविण्य श्रेणीत २५, प्रथम श्रेणीत २४,द्वितीय श्रेणीत२५ आणि उत्तीर्ण श्रेणीत ७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटी,सांगलीचे पदाधिकारी,शाळा समितीचे चे॓अरमन नेमिनाथ नेजे,मुख्याध्यापक संजय तावदारे,पर्यवेक्षक एस.बी.मलकाने, वर्गशिक्षक एम्.बी.मुरगुंडे आणि डी.आर.पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.