प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे मनपाचे स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येरवडा, पुणे यांचे SSC व HSC 2025 बोर्ड परीक्षांचे गौरवशाली निकाल लागला आहे. गेल्या यशस्वी परंपरेप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिकेचे स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्य व उच्च माध्य विद्यालय, येरवडा, पुणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्वल कामगिरी केली आहे. दहावी चा निकाल १००% लागला असून बारावी चा निकाल ९०% इतका लागला आहे.
दहावी परीक्षेत एकूण १२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह, ६२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत आणि ५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे.
दहावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनी:
१. खान सालेहा सलीम – ८३.४०%
२. कुरेशी तजईन फातिमा अब्दुलवहाब – ८१.४०%
३. शेख साबेरा मोहम्मद हनीफ – ८१.४०%
विज्ञान उच्च माध्य विद्यालयातील एकूण ६० विद्यार्थिनी परिक्षेत बसले होते. त्यांपैकी ६ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत, २९ विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणीत आणि १९ विद्यार्थिनींनी तृतीय श्रेणीत यश मिळवले. एकूण निकाल ९०% लागला.
बारावीत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थिनी:
१. बाबुडे सबा महिबूब – ७४.५०%
२. बाजे मुस्कान जाफर – ६५.५०%
३. अन्सारी सना अफसर – ६४.६७%
या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे महानगरपालिकेच्या माध्य व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा.आशा उबाडे आणि उपशिक्षणाधिकारी मा.दामोदर उंडे यांनी विद्यार्थ्यांचे, तसेच शाळा व कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती शेख सफिया, खान परवीन,अरब शबाना, सय्यद शकील, निकहत जबीन, कुमठे रूही, सगरी मोहम्मद खालिद, शेख फौजिया, शेख हिना कौसर, बळीराम बडे, बी. बी. फातिमा, फराह नाझ, सुमय्या, दाऊद , रिझवाना, सायमा, सोफिया, निदा, आयशा, श्रीकांत आणि सर्व शिक्षकीय व अशिक्षकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।