प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ कलावती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली सौ कलावती गुरव यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून काम केले आहे विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचे काम त्यांनी केले इचलकरंजी महानगरपालिका मध्ये शिक्षिका म्हणून 28 वर्षे सेवा केली व मुख्याध्यापिका म्हणून चार वर्षे काम केले तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मुलगा श्री प्रशांत गुरव सर यांनी अतिग्रे ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहिले
म्हणूनच त्यांना त्यांची केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून अतिग्रे येथील नागरिकांनी सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणले आणि प्रभागाची विकासाची सूत्र हाती घेतली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री भगवान पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक 22 मे 2025 रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्री सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी सौ कलावती गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी केली यावेळी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला
यावेळी सदस्य श्री बाबासो पाटील, अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील,सदस्या सौ छाया पाटील, दिपाली पाटील, कल्पना पाटील , अक्काताई शिंदे, वर्षा बिडकर,, ग्रामपंचायत अधिकारी श्री सुनील खांडेकर,राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्री श्रीधर पाटील ,पांडुरंग पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, माजी सरपंच प्रशांत गुरव, सामाजिक कार्यकर्ते धुळोबा पाटील, जयवंत पाटील ,धनाजी पाटील, नामदेव वड्ड ,बाबासाहेब शिंदे , सचिन पाटील, सचिन चौगुले,संजय चौगुले, अमर पाटील, उत्तम पाटील ,भरत शिंदे, संजय पाटील, सुकुमार सूर्यवंशी, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, नंदकुमार पाटील, बाळासो पाटील, शिवाजी पाटील, बंडू चौगुले, राजवर्धन पाटील, कृष्णात पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी सौ कलावती गुरव यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला