न्यायमूर्ती अमित अगरवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

 शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांनी नेव्ही,आर्मीचे प्रशिक्षण घेऊन देश संरक्षणासाठी मोठे योगदान द्यावे :- एम डी चौधरी.  


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :


तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे येथे ज्ञानगंगा आविष्कार  फाऊंडेशनच्या वतीने दिनांक १८मे २०२५ रोजी शिबिर आयोजित करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळांच्या प्रात्यक्षिक दाखवत सर्वांना चकित केले तळेगाव दाभाडे येथे ज्ञानगंगा अविष्कार फाउंडेशन एडवेंचर्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी आर्मी नेव्ही ट्रेनिंग व आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विनय चंद्रकांत चव्हाण (अध्यक्ष) .व संस्थापिका अरुणा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक कमांडो व नेव्ही ट्रेनिंग व इतर ऍक्टिव्हिटीज साठी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये गुणवंत व ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.






 दिवाणी व फौजदारी न्यायालय वडगाव मावळ चे न्यायमूर्ती अमित अगरवाल व ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीचे समन्वयक एम डी चौधरी.ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील व एक पालक व जानवी एंजल्स च्या संस्थापिका वृषाली कदम वीर गुजर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बेसिक कमांडो व नेव्ही ट्रेनिंग व इतर ऍक्टिव्हिटी चे इत्यादी बाबींचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले 

         यावेळी न्यायमूर्ती श्री अमित अगरवाल यांनी विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबर मैदानी खेळ व मातीतील खेळ जोपासला पाहिजे   ज्ञान गंगा फाऊंडेशन ॶकॅडमी हे चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहे असे न्यायमूर्ती अगरवाल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ह्यूमन राईटचे एम डी चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबर नेव्ही ,आर्मी याचे शिक्षण घेऊन देश संरक्षणासाठी मोठ्य योगदान द्यावे जेव्हा विद्यार्थी घडविले जातात तेव्हा देश घडविले जातात आजचे हे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य आहे विद्यार्थ्यांनीही चांगले शिक्षण प्रशिक्षण घेऊन देश सेवे साठी सर्वोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे आव्हान एम डी चौधरी यांनी यावेळी केले. 

        याप्रसंगी एक पालक व जानवी एंजल्स संस्थापिका वृषाली कदम वीर गुजर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला विद्यार्थ्याने शिक्षणा बरोबर मैदानी खेळामध्ये ज्यांचे आवड आहे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे मैदानी खेळात जेव्हा विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन देशासाठी आपला योगदान देतात तेव्हा देशाचे ही नाव उज्ज्वल होत असतो यासाठी विद्यार्थ्याचे उन्नती करणे खूप गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

       संस्थेचे अध्यक्ष विनय चंद्रकांत चव्हाण यांचं या फाउंडेशन मध्ये खूप मोठ्य योगदान असल्याने चांगले विद्यार्थी घडवत आहेत शेवटी न्यायमूर्ती अमित अगरवाल याने फाऊंडेशनचे कौतुक करत आभार व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post