हेरवाडात श्री गुरुचरित्र,परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळा, .१३ ते २१ मे २०२५ अखेर आयोजन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड:प्रतिनिधी :

हेरवाड ता.शिरोळ येथे परमाब्धिकार प.पू.परमात्मराज महाराज (श्री क्षेत्र आडी) यांच्या जन्म उत्सवानिमित्त श्री गुरुचरीत्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केला आहे.तरी भाविकांनी वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यंदाचे ३ रे वर्ष आहे. मंगळवार दि.१३ मे २०२५ ते बुधवार २१ मे २०२५ पर्यंत सकाळ ७.०० ते ११.०० पारायण सोहळा होणार आहे.

व्यासपीठ चालक ह.भ.प.श्री.महादेव वाळके (अकिवाट), ह.भ.प.श्री.विलास शिरढोणे (हेरवाड) हे आहेत.बुधवार दि. २१ मे २०२५ रोजी स.११.०० नंतर महाप्रसाद होणार आहे. ज्या भक्तांना पारायणसाठी बसायचे आहे.त्यांनी आपली नावे खालील नंबरवर नोंद करायची आहेत.सौ.मुक्ता पुजारी मो.७०५८८०४१४२,सौ.सीमा बरगाले मो.९३२२६८९९२२

जय हनुमान कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ,हेरवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post