राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. .

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post