बकरी धुण्यासाठी गेलेल्या मेढ़पाळाचा तलावात पडून मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर - कागल तालुक्यातील व्हन्नुर येथील मेढ़पाळ रंगराव शिंगु हजारे (वय 40.रा.व्हन्नुर ता.कागल) हे दर्याचे वडगाव येथे बकरी घेऊन गेले होते.तेथे असलेल्या तलावात बकरी धुण्या साठी गेले असता बकरी धुताना तलावातील पाण्यात पडून बुडाल्याने त्यांना कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्या बाहेर काढून   बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार रविवार (दि.04 मे) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post