प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टिल रोडवर अज्ञात वाहनाचा धडकेत अनोळखी विवाहिता जखमी झाली होती.तिला 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
हा अपघात रविवार (दि.04 मे) रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान सदर मयत विवाहित तरुणीची ओळख पटविण्यात शिरोली एमआयडीसी पोलिसांना यश आले असून खुशबू संदिप प्रजापती (वय 21.रा.झेंडा चौक ,विलासनगर,पु.शिरोली. मूळ गाव उत्तरप्रदेश) असे असून एक आठवड्या पूर्वी गावाहून पती समवेत पु.शिरोली येथे आल्या होत्या.तिचे पती एका ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करीत असून सहा वर्षा पासून पु.शिरोली येथे रहात आहेत. शनिवारी सांयकाळी जेवण झाल्यावर रात्रीच्या सुमारास खुशबू या लघुशंके साठी बाहेर गेल्या होत्या.बराच वेळ झाल्याने परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी त्या परिसरात शोधा शोध केली पण त्या न सापडल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.दरम्यान त्या परिसरात झालेल्या अपघातात एका अनोळखी विवाहित तरुणीचा अपघातात मृत्यु झाल्याने शिरोली पोलिस मयताच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना पोलिसांना ओळख पटविण्यात यश आले.या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.