प्रेस मीडिया लाईव्ह :
अर्जुन धुमाळे :
इचलकरंजी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, इचलकरंजी यांच्या वतीने भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले इचलकरंजी शिवतीर्थ येथे पार पडलेले कार्यक्रम, जे श्रीमंत छत्रपती मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास महाजन गुरुजी, माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे, आमदार राहुल प्रकाश आवाडे साहेब व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी शिवराज्याची महती उलगडणारे उद्बोधक विचार मांडून उपस्थितांचे मन जिंकले.
हजारो नागरिक, युवक, महिला, आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत ढोल-ताशांचे गजर, आणि भगव्याच्या लाटा यांच्यासह इचलकरंजीच्या रस्त्यांवर शिवजयंतीचा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखात साजरा झाला.
शिवप्रेम, शिस्त आणि संस्कारांचे प्रतीक ठरलेली ही मिरवणूक, इचलकरंजीकरांच्या अभिमानाचा सोहळा ठरला!