प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड: प्रतिनिधी :
१ मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त विविध समारंभ आयोजित केले जातात.या दिवशी संघटित कामगारांचा यथोचित सन्मान केला जातो पण असंघटीत कामगार यापासून अलिप्त असतात.त्यापैकीच प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतील शालेय पोषण आहार स्वयंपाकी ठेकेदार व मदतनीस होय.अत्यल्प मानधनावर कार्यरत असणाऱ्या शालेय पोषण आहारकडील कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगारदिनाचे औचित्य साधून दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय रामचंद्र निकम यांनी केंद्रातील जिल्हा परिषद शाळांमधील स्वयंपाकी ठेकेदार व मदतनीस यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साडी व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. उपस्थित महिलांनी मनोगतांतून कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले.त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी दत्तवाडचे माजी सरपंच आण्णाप्पा सिदनाळे (यजमान), केंद्र प्रमुख संजय निकम, सौ.लता संजय निकम,बॅ.बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन कुमार सिदनाळे,केंद्र समन्ययक सुभाष कुरुंदवाडे,मुख्याध्यापक दत्तात्रय कमते,रविंद्र सिदनाळे,सहदेव माळी, दिलीप शिरढोणे,सुनिता खटावकर, अध्यापिका विद्या सुतार,प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले,सामाजिक कार्यकर्ते राजू ढोणे,साधना सावंत यांच्यासह शालेय पोषण आहार स्वयंपाकी ठेकेदार,मदतनीस उपस्थित होते.