प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील उचगाव येथील राणी भगवान भोसले (वय 40) ह्या गांधीनगर येथील बांधकाम चालू असलेल्या बिल्ड़ींग वरुन खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून मिळून आल्याने बेशुध्दावस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार मंगळवार (दि.06 मे ) रोजी उघडकीस आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
उचगाव येथेरहात असलेल्या राणी भोसले या पती समवेत गांधीनगर येथे गोकुलधाम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस चंदरलाल यांच्या बिल्डिंगचे बांधकाम चालू आहे.त्या बांधकामावर वॉचमन म्हणून पती पत्नी दोघे मिळून काम करीत असल्याने तेथेच शेडवजा खोलीत रहात आहेत.सोमवार रात्री राणी भोसले बांधकामावर फ़ेरफ़टका मारण्यासाठी गेल्या असता त्या लवकर परत न आल्याने त्यांच्या पतीने शोधशोध केली.मात्र त्या मिळून आल्या नाहीत.आज सकाळी सहाच्या पुन्हा शोध घेत असताना बांधकामाच्या खालील पाण्याच्या टाकीत बेशुध्दावस्थेत मिळून आल्या.या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून जखमीना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
त्यांच्या पश्च्यात पती आणि एक मुलगा आहे.