तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड प्रतिनिधी :
जयसिंगपूर :जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता विकास उपक्रमांसाठी तसेच भौतिक सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.ते जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ यांचे वतीने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन २०२२४-२५ तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच कुंजवन उदगाव येथे पार पडला. त्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा उंचावत असून पटसंख्या वाढत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेली उर्दू भाषेतील पहिली मार्गदर्शक पुस्तिका शिरोळमध्ये प्रकाशित झाली आहे. नजिकच्या काळात हातकणंगले मतदार संघातही यड्रावकर सोशल फौंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सराव परीक्षा घेण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी आमदार डॉ. अशोकराव माने यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असून अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले.
स्वागत गट शिक्षण अधिकारी सौ. भारती कोळी यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेवून समाधान व्यक्त केले.
पुरस्कारीत करण्यात आलेल्या शाळा पुढीलप्रमाणे :
प्राथमिक गट शासकीय -
जिल्हास्तर प्रथम क्रमांक -कुमार विद्या मंदिर टाकवडे.तालुकास्तर प्राथमिक विभाग गट अ -प्रथम क्रमांक -कुमार विद्या मंदिर कुरुंदवाड नं.३,द्वितीय क्रमांक -विद्या मंदिर लाटवाडी,तृतीय क्रमांक - केंद्रीय शाळा कन्या अकिवाट.
केंद्रस्तर प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे -वि.मं.नृसिंहवाडी,राजर्षि शाहू वि.मं.शिरोळ क्र-१,केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड,कुमार वि.मं दानोळी नं.२,वि.मं.कुटवाड,उर्दू वि.मं.अ.लाट,उर्दू वि.म.उदगाव,देसाई वि.म.उदगाव व कन्या उदगाव, जयसिंगपूर न.पा.उर्दू नं.४.
माध्यमिक अशासकीय गट -
जिल्हास्तर प्रथम क्रमांक -न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अ.लाट.
तालुकास्तर माध्यमिक विभाग गट -अ
प्रथम क्रमांक -आदर्श विद्यालय कोथळी,द्वितीय क्रमांक -जनतारा कल्पवृक्ष वि.मं.जयसिंगपुर,तृतीय क्रमांक -हसूर हायस्कूल हसूर,
माध्यमिक अशासकीय गट -केंद्रस्तर प्रथम क्रमांक -राजापूर खिद्रापूर हायस्कूल राजापूरवाडी,नांदणी हायस्कूल नांदणी,श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड,न्यू इंग्लिश स्कूल चिंचवाड,श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ,सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी,न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ, उर्दू हायस्कूल शिरोळ,डॉ.अल्लमा हायस्कूल कुरुंदवाड.
याच बरोबर शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बाबासाहेब वनकोरे, परीक्षा विभागप्रमुख अनिल ओमासे, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,शिवाजी चौगुले,केंद्र प्रमुख आण्णा मुंडे,रियाजअहमद चौगले,संजय निकम,यशवंत पेठे,संदीप कांबळे,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे,सुनिल एडके,मनोजकुमार रणदिवे,सुरेश पाटील,राजाराम सुतार,सुनिल कळसापन्नावर यांचे सह मुख्याध्यापक, शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.