प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड:प्रतिनिधी :
नवे दानवाड येथे नव्याने बांधलेल्या श्री महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा ३ ते५ मे२०२५ अखेर ३ दिवस मोठया भक्तीपूर्ण वातावरणात व उत्साहात पार पडला. दिव्य प्रवचन सोहळ्याने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते . या सोहळ्यासाठी परमपूज्य श्रीमन्नीरंजन जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामी (श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ,निडसोशी) यांचे दिव्य सानिध्य लाभले.
दिनांक ०३ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते ९ पर्यंत श्री म.नी.प्र. महान्त सिद्धेश्वर महास्वामीजी(जडे सिद्धेश्वर आश्रम बेलबाग,गडहिंग्लज) यांचे दिव्य प्रवचन झाले. दिनांक ०४ मे २०२५ रोजी सकाळी ७ ते ११ वाजता कलश उत्सव सोहळा पार पडला.कलशाची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.संध्याकाळी ७ ते ९ पर्यंत श्री म.नी.प्र.महान्त सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रवचन झाले.
दिनांक ०५ मे २०२५ रोजी, सकाळी ५.३० वाजता रुद्राभिषेक, पूजाविधी,नवग्रह होम,रुद्र होम आणि कलशाभिषेक पूजा संपन्न झाली.सकाळी ९.३० वाजता कलशारोहण सोहळा परमपूज्य श्रीमन्त्रीरंजन जगगुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामी (श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ निडसोशी )यांचे अमृतहस्ते सकाळी १० वाजता स्वामींचे आशीर्वचन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले नवे दानवाड मधील समस्त लिंगायत समाजाने सोहळ्याचे नेटके संयोजन केले.त्यासाठी गावातील विविध संस्था,तरुण मंडळे,विविध धार्मियांचे मोलाचे सहकार्य लाभले.