यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपाई (सचिन खरात गट ) या पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला सर 

कोल्हापूर.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने यंत्रमाग कामगारांच्या पगारवाढीसाठी राज्य शासनाने काढलेल्या जी. आर.ची आमंलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला (सर ), कोल्हापूर जिल्हाआध्यक्ष आकाश कांबळे, जिल्हाकार्याध्यक्ष हर्षद कांबळे, कमगार आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष दिलीप कुदळे, जिल्हा सेक्रेटरी दगडू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते 

यंत्रमाग कामगारांसाठी 9 पैसे पगारवाढ करण्याचा जी. आर.राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला त्याची यंत्रमाग धारक अंमलबजावणी करत नाही म्हणून यंत्रमाग मालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी साहेब यांना रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेतली

यंत्रमाग कष्टकरी कामगारांना हक्काचा पगारवाढ मिळाला पाहिजे आणि आपण स्वतः जातीने लक्ष घालून न्याय मिळून द्यावा आणि राज्य शासनाच्या जी. आर. ची अंमलबजावणी होत नसेल तर सबंधित यंत्रमाग मालकावर कायदेशीर कारवाई करावी असे सांगण्यात आले जिल्हाधिकारी अमोल हेडगे साहेब यांनी सांगतले की मी कामगार आयुक्त यांना कळवतो आणि पुढील कारवाई करायला सांगतो असे आश्वासित केले 

यंत्रमाग कामगारांना न्याय हक्क नाही मिळाला तर रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्याचे मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर )यांनी दिला

Post a Comment

Previous Post Next Post