प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड:प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी -मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता १२ वी चा निकाल काल जाहीर झाला. नेहमीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले. दत्तवाड येथील श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चा वाणिज्य शाखेचा निकाल १०० % लागलेला आहे.
वाणिज्य शाखेच्या १०० % निकालाची परंपरा यंदा ही अबाधित राखली आहे.कु.अमृता भाऊसो पुजारी हिने ८८ %गुण मिळवून कुरुंदवाड केंद्रात व ज्यु. कॉलेज मध्ये प्रथम आली.कु.सुप्रिया सुधाकर खोत८५ % गुण मिळवून द्वितीय व कु.सृष्टी विलास बिरणगे ८३% गुण मिळवून तृतीय आली.
कला शाखेचा निकाल ८२% लागला आहे.कु.प्राजक्ता दिलीप शिंदे ७६ % गुण मिळवून प्रथम,कु.प्रतिमा मनोहर मोकाशी ७४% गुण मिळवून द्वितीय तर कु.रत्नश्री राजकुमार चिगरे ७३ % गुण मिळवून तृतीय आली.
सदर विद्यार्थी,विद्यार्थिनींना मुख्याध्यापक संजय तावदारे,पर्यवेक्षक एस.बी. मलकाने, विभागप्रमुख सौ.रेखा भिलवडे, चेअरमन नेमीनाथ नेजे यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.