पोलिस असल्याची बतावणी करण्यारयावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पोलिस असल्याची बतावणी करून ट्राफिक पोलिसाची फसवणूक करणारा विनोद भास्कर कांबळे (रा.अतिग्रे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की ,25/03/2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास विनोद भास्कर कांबळे हे आपली दुचाकी  गाडी नं.MH-09 GQ7010 वरुन  दाभोळकर कॉर्नर येथे आले असता तेथे शहर वाहतूक शाखेचे  पो.अं .अमर उबाळे हे तेथे सेवा बजावत होते.त्या वेळी त्या दुचाकीवाल्याकडे लायसन्सची मागणी केली असता दुचाकीवाल्याने आपण इंचलकरंजी येथे ट्राफिक पोलिस असून पावत्या फाडण्याचे काम करीत असल्याचे सांगून चार दिवस किरकोळ रजेवर असल्याचे सांगितले त्याचे नाव आणि ओळखपत्राची मागणी केली असता त्याने आपले नाव किरण कांबळे असून ओळखपत्र घरी विसरल्याचे सांगीतले असता ट्राफिक पोलिस अमर उबाळे यांना शंका आल्याने हा माणूस काही तरी लपवत असावे म्हणून पोलिस निरीक्षक याच्याशी संपर्क साधून त्याला शाहुपुरी पोलिस ठाण्यात हजर केले असता त्याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिस असल्याचे खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले   त्याने आपले नाव विनोद भास्कर कांबळे असल्याचे सांगितले.सदर विनोद कांबळे विरोधात अमर उबाळे यांनी फिर्याद दिल्याने शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

     पो.कॉ.960 .अमर उबाळे यांनी सतर्क राहुन काम केल्याने ही कारवाई करण्यात आली .

1 Comments

Previous Post Next Post