पत्नीसह तिघांचा खून केल्या प्रकरणी एकास फाशीची शिक्षा.

 






प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : जयसिंगपूर - पत्नीसह ,सासू,मेव्हणा आणि मेव्हणी या चौघांचा खून केल्या प्रकरणी आरोपी प्रदिप विश्वनाथ जगताप (वय 35 रा.शिरगांवे मळा,यड्राव .मुळगाव कवठेगुलंकद ता.शिरोळ) याला अतिरिक्त  जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंगपूर मा.गिरीश गुरवसो यांनी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे .

अधिक माहिती अशी की,आरोपी प्रदिप जगताप हा पत्नीसह यड्राव येथे शिरगावे चाळ परिसरात रहात होता.06/10/2018 रोजी पत्नी रुपाली हिचा चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढ़ून मागाच्या लाकडी मारयांने सासू छाया श्रीपती आयरेकर ,पत्नी रुपाली ,मेव्हणी सोनाली आणि मेव्हणा रोहित श्रीपती आयरेकर यां चौघांचा खून केला होता.याची फिर्याद अभिषेक आयरेकर यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली असता शहापूर पोलिसांनी आरोपी प्रदिप जगतापवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मा.गिरीश  गुरवसो यांच्या कोर्टात चालून सरकारी वकील म्हणून Ad. व्ही.जी.सरदेसाई यांनी काम पाहिले.

परिस्थीतीजन्य पुरावा आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपी प्रदिप विश्वनाथ जगताप याला फाशीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे .या गुन्हयांचा प्राथमिक  तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आय.एस.पाटील आणि पूर्ण तपास शहापूर पोलिस ठाण्याचे सहा .पोलिस निरीक्षक एस.ए.हारुगडे यांनी केला आहे.याकामी पोहेकॉ.सतीश अरुण कांबळे यांनी मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post