आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात आनंद व्यक्त केल्याच्या कारणातुन एकावर हल्ला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सध्या आयपीएल क्रिकेट चालू असल्याने मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना चालू असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहता बंडोपंत बापूसो तिबीले (वय 63.रा.हणमंतवाडी) यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्या प्रकरणी बंळवत महादेव झांझगे(50)आणि सागर सदाशिव झांझगे (35.दोघे रा.हणमंतवाडी ) यांना करवीर पोलिसांनी अटक केली.

अधिक माहिती अशी की,बुधवारी रात्री बंळवत झांझगे आणि सागर हे गल्लीतील एका घरात आयपीएलचा सामना बघत बसले होते.हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत.हैदराबाद संघाने जास्त रन्स केल्याने हे रागात होते.त्यात वेळी चेन्नईचा चाहता त्या ठिकाणी येऊन क्रिकेट बघत असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आता मुंबई संघ कसा जिंकणार ? असे म्हणत चेन्नईचे कौतुक केल्याने बळवंत झांझगे यांनी तिबीलेच्या डोक्यात काठीने मारहाण केली.याच वेळी सागरने डोक्यात फळी मारल्याने तिबीले बेशुध्द होऊन खाली पडले .त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण डोक्याला गंभीर मार लागल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.या प्रकरणी दोघां झांझगेवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post