दमदाटी करून लुटमार प्रकरणी तिघांना अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -लक्ष्मीपुरी येथे असलेल्या बिअर बारच्या आवारात दोघां जणाना मारहाण जबरदस्तीने मोबाईल घेतल्या प्रकरणी  संतोष संभाजी मोहिते (वय 29 रा.तामगाव ,ता.करवीर )याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी फक्त संशयीताच्या वर्णनावरुन या तिघांना अटक करून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.यात  आशुतोष विकास देवरे (वय 19.उजळाईवाडी)रोहित सतीश गोसावी (वय 28.रा.शिवाजी पेठ)आणि प्रतिक कृष्णात कोकणे(31रा.जगतापनगर )या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल जाधव तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post