दोघांच्या वादात तिसरयाचे नुकसान.हद्दीचा वाद टॉऊन हॉल एसटी बस स्थानकाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापुर- कोल्हापूर कोकण कडे  जाणारा एसटी बस सीबीएस वरुन सुटणारया एसटी ही पहीला स्टॉप रेल्वे एसटी बस स्थानक असून त्याच्या नंतर टॉऊन हॉल एसटी बस स्थानक  हा महत्वाचा स्टॉप आहे कारण या स्टॉप वरुनच पन्हाळा ,जोतिबा ला जाणारे पर्यटक तसेच मलकापूर आणि अन्य ठिकाणी जाणारा कर्मचारी वर्ग आणि ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी वर्ग हा येथेच थांबत असे.ह्या एसटी स्टँडवर बसण्याठी  ,थांबण्याची कोणतीही सोय नाही.

वयस्कर वृध्द ,गरोदर महिला ,लहान मुलांना कडेवर घेऊन उभ्या असलेल्या महिलाना बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही.बाहेरचे पर्यटक ह्या एसटी स्टँडवर आलेकी तोंडाला रुमाल लावून एसटी बस स्थानकाची दुरावस्था पाहून आश्चर्य करतात.त्या फुटल्याल्या फरशा ,भेगा पडलेला कठडा ,साईटला पडलेला कचरा.आणि अस्वछ एसटी बस स्थानक,महिलांना शौचालयची कोणतीही सोय नाही.प्रवासी या स्थानकावर थांबण्या एवजी ते रस्त्यावर उभे राहतात त्या मुळे अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच येथे वाहतूक नियंत्रक नेमण्याची गरजच आहेत.विद्यार्थी वर्गाला एसटी पास मिळण्याची सोय व्हावी यासाठी एसटी विभागाने सोय करण्याची गरज आहे.हा स्टॉप एसटी महामंडळाला उत्पन्न मिळवून देणारा स्टॉप आहे.आतापर्यंत कितीतरी प्रवाशांनी एसटीच्या संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात आणि प्रत्यक्ष भेट घेऊन प्रवाशाना वरिल सुविधा मिळाव्यात म्हणून विनंती केली तरीही त्याकडे दुर्लक्ष केले.संबंधिताना पाऊस पडला काय नाही पडला त्याना काहीच फरक पडत नाही कारण त्याना पगार चालू असतो.आता तर त्यांना प्रवाशांची गरजच नाही प्रवाशी एसटी मध्ये बसले काय किंवा खाजगी वाहनाने गेले काय ?त्याना कोणतं ही देणं घेणं नाही.आता तर शासणाने महिला साठी एसटी प्रवासात 50 %सवलत जाहीर केल्या मुळे ह्या महिला कितीही वेळ झाला तरी एसटीने प्रवास करत असल्यामुळे उत्पनात वाढ़ झाली आहे.जरी एसटी महा मंडळ महिलाना 50% सवलत देत असलं तरी उरलेले 50 % सरकार एसटी महा मंडळाला देतं त्यामुळे टॉऊन हॉल एसटी बस स्थानकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे समजले .या बाबतीत अधिक चौकशी केली असता असे समजले की ह्या स्थानकाच्या बाबत हद्दीचा वाद आहे.सीबीएसच्या संबंधितांना सांगीतले तर ते म्हणतात टॉऊन हॉल एसटी बस स्थानक आमच्या हद्दीत नाही तर ते संभाजीनगर एसटी बस डेपोच्या हद्दीत येते तर संभाजीनगर एसटी च्या संबंधिता कडे चौकशी केली असता ते  म्हणतात हे आमच्या हद्दीत नाही. मग नेमकं कुणाच्या हद्दीत हाय ते स्पष्ट करुन संबंधित एसटी बस अधिकारी यानि जातीने लक्ष घालून टॉऊन हॉल एसटी बस स्थानकाची दुरुस्ती व्हावी अशी प्रवाशी वर्गातुन मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post