गझल लेखनाचा उलगडलेला प्रवास आणि बहारदार मुशायरा



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : 

नऊ रसांच्या आस्वादाने माझी भूकच नाही भागत

 *मीच दहावा रस होतो अन गझलेमधुनी जातो मांडत* ' असे गझल लेखनातील आपले वेगळेपण सांगत प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या गझल लेखनाचा गेल्या अडतीस वर्षाचा प्रवास उलगडून सांगितला. ते' गझल मंच ' या संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाइन मुशायऱ्यामध्ये प्रमुख गझलकार म्हणून बोलत होते. गझलमंचचे आयोजक डॉ.रे. भ. भारस्वाडकर (औरंगाबाद ) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यातून गझलमंच समूह सुरेश भट यांना अभिप्रेत असलेली गझल पुढे नेण्यासाठी तयार केला गेला आहे हे स्पष्ट केले.

प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा (मुंबई )यांनी पाहुण्यांची ओळख करून देत या मुशायऱ्याचे अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले. या मुशायऱ्यात दिलीप पाटील (राजुरा) ,सिराज शिकलगार ( पलूस), प्रज्ञा कुलकर्णी उर्फ राज्ञी (वसमत ) ,डॉ.वैभव लोखंडे (ठाणे), बबन धुमाळ ( पुणे), प्रशांत भंडारे (चंद्रपूर ) यांनी आपल्या गझला सादर केल्या.

प्रसाद कुलकर्णी यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कवितेशी जुळलेली नाळ आणि वयाच्या विशी मध्ये १९८५ साली

मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या संपर्कात आल्यानंतर गझलेच्या क्षेत्रात झालेला प्रवेश व त्यानंतर गेली ३८ वर्षे गझले सोबत झालेला प्रवास विशद केला. सुरेश भटांनी आणि पंडित यशवंत देव यांनी अखेरपर्यंत वेळोवेळी केलेले मार्गदर्शन लेखनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले हेही स्पष्ट केले.तसेच गेली ३८ वर्षे समाजवादी प्रबोधिनीच्या वैचारिक कामाबरोबरच व गद्य लेखना बरोबरच *गझल लेखनाच्या प्रवासातील गझलांकित (२००४ ), गझलसाद (२०१०), गझलानंद (२०१४), गझल प्रेम ऋतूची (२०२१), आमची  गझलसाद (२०२२)* या गझल संग्रहांच्या निर्मिती प्रवासाचा उलगडा केला या संग्रहाच्या नावाने स्थापन झालेल्या संस्था, गेली तीन वर्षे सुरू असलेले 'एक रविवार: एक गझल 'हे युट्युब चॅनेल , गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या गझलसागर प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनातील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध मंचावरून सादर केलेल्या गझला आणि व गझल विषयी केलेले भाष्य, गझलेची तांत्रिकता व मांत्रिकता, मराठी गझलेचे आजचे स्वरूप आदी विविध विषयावर विवेचन केले. आणि आपल्या अनेक गझलाही सादर केल्या.

या मुशायऱ्यात 

*बोललो फारसे ना तिथे मी जरी*

*लोक म्हणती सभा वादळी राहिली*

 'दिलीप पाटील (राजुरा),

*सोस कुठे मज मैफिलीचा,*

*साध्या भोळ्या लोकात मी'* 

सिराज शिकलगार (पलूस ),

*तिच्या डोळ्यातला वैशाखवणवा जाळतो आहे*

*,झळा जवळून बघण्याच्या क्षणाला टाळतो आहे*

'प्रशांत भंडारे(चंद्रपूर ),*जीवन येथे दुसऱ्यांचेही सुंदर करता येते*

*भले आपले ते केव्हाही नंतर करता येते*

'बबन धुमाळ(पुणे ),

*मी तळव्यावर फूल ठेवले*

*,ओंजळ झाली त्याची'*

प्रज्ञा कुलकर्णी उर्फ राज्ञी (वसमत ),

*वास चाफ्याचा सुगंधी*,

*मोगऱ्याचा येत नाही*

 'डॉ. वैभव लोखंडे (ठाणे ) आदींनी आपल्या वेगवेगळ्या रसांच्या आशयघन रचना सादर केल्या. 

*प्रा. सुनंदा पाटील  यांनी गझल आणि गझल लेखनातील बारकावे स्पष्ट करत तसेच वर्तमानातील मराठी गझलकारांचे शेर पेरत या मुशायऱ्याचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन केले*.

*लेखणी माझी तशी अलवार नाही*

*लेखणीने मांडली तक्रार नाही* 

अशा बहारदार शेरांनी युक्त गझल गझलनंदाने दाद घेत सादर केली .


दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या मुशायऱ्यात सुधाताई नरवाडकर, किरणताई चौधरी, संगीता बडे , रेखा देशमुख, प्रा.नरहर कुलकर्णी, .डॉ.दिलीप कुलकर्णी, आत्माराम कदम, लक्ष्मण शिवणकर, ऋता ठाकूर, रमेश धापणे, भारती सावंत, वैशाली नायकवडी, प्रशांतकुमार धुमाळ, पंडित वराडे मेहमूदा शेख, सुरेश सोनवणे, अरुण सावंत, लता पाटील , गौतम सूर्यवंशी, प्रतिभा विभुते, वैभव लोखंडे , अनुया काळे आदींसह अनेक गझल रसिक श्रोते म्हणून सहभागी झाले होते.डॉ.रे. भ. भारस्वाडकर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post