आरोग्य संपन्न राष्ट्र निर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न हवेत - कैलास मलिक

 सेंट ॲण्टस् विद्यालयात बाराशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी, पुणे (दि. ३० मार्च २०२३) - समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सुविधा आणि शासकीय योजना पोहचल्या तरच भारत आरोग्य संपन्न राष्ट्र होईल. त्यासाठी सरकार, विविध स्वयंसेवी संस्था या सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे मत लायन्स क्लब शताब्दी पुणे अध्यक्ष लायन कैलास मलिक यांनी व्यक्त केले.

  लायन्स क्लब शताब्दी पुणे यांच्या सौजन्याने व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रूग्णालयाच्या सहकार्याने सेंट ॲण्टस् प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय त्रिवेणीनगर, निगडी येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब शताब्दीचे माजी प्रांतपाल लायन ठाकूर छुगानी, नुतन अध्यक्ष ला. संजय सहानी, ला. फ्रेड्री गोदरेज, कार्यकारी सदस्य ला. थॉमस भरुचा, सेंट ॲण्टस् एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सी. जे. फ्रान्सिस, सेक्रेटरी ॲनी फ्रान्सिस, सल्लागार ॲलन ॲन्थनी, प्राचार्या करुणा, भारती मराठे आदी उपस्थित होते.

 या दोन दिवसीय शिबिरात डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रूग्णालयाचे डॉ. उमंग, डॉ. शिवप्रताप बिरादार, डॉ. वृषाली नाटे, डॉ. प्रणव शर्मा, डॉ. सानिका विटकर, डॉ. भूमी गुप्ता, डॉ. पल्लवी नखाते यांनी दंत तपासणी, नेत्र, कान, नाक, घसा आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. इयत्ता पहिली ते उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. 

  सी. जे. फ्रान्सिस यांनी प्रास्ताविक केले. आभार ॲनी फ्रान्सिस यांनी मानले. सेंट ॲण्टस् विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांनी संयोजन केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post