अशोकराव स्वामी यांच्यावाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या शनिवार 1 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 




  शनिवारी सकाळी 9 वाजता अरुण विद्यामंदिर येथे माजी नगराध्यक्षया सौ अलका स्वामी, तानाजी पोवार,दिलीप मुथा, सुनील तोडकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या  उपस्थितीत विध्यार्थ्यानी खाऊ वाटप करण्यात येणार आहे त्याच ठिकाणी नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता आयजीएम दवाखान्यात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अब्दुल लाट येथील अनाथआश्रय मध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या सर्व सामाजिक कार्यात नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन अशोकराव स्वामी वाढदिवस समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post