कोण उमेदवार बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष



प्रेस मीडिया लाईव्ह :

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) सकाळपासून मतदान सुरू झाले होते. पण, दोन्ही मतदारसंघात मतदानाला अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे. कसबा पेठेत पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान तर पिंपरी चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान झाले आहे.

पुणे कसबा पोटनिवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 18.50 टक्क्यांपर्यंतच नोंद झाली  , तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात तर अवघ्या 3 टक्क्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनी आवाहन करून देखील चिंचवड मधील मतदानाचा टक्का वाढताना दिसला नाही.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. एकूण 16 उमेदवार रिंगणात आहे. कसब्यात एकूण २ लाख ७५ हजार ४२८ मतदार आहे. यात १ लाख ३८ हजार ५५० महिला तर १ लाख ३६ हजार ८७३ मतदार आहे. तर फक्त ५ तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण मतदार केंद्र ७६ मतदान केंद्र आहे. यात ९ मतदार केंद्र संवेदनशील आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाटी १३०० पोलिस कर्मचारी तैनात होते.

चिंचवड निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष मिळून एकूण २८ उमेदवारांचे मत मतपेटीत बंद झाले आहे. तर या मतदारसंघात 5 लाख 68 हजार मतदार आहेत. मतदान पार पडले असले तरी कोण उमेदवार बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post