कसबा आणि चिंचवड मध्ये कोण नायक बनणार..?



प्रेस मीडिया लाईव्ह :

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे 50.06 टक्के आणि 50.47 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. येत्या गुरुवारी 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. कसब्यात सन 2019 च्या निवडणुकीत 51.54 टक्के, तर चिंचवडमध्ये 55.88 टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणूक असल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडणार नाहीत ही भीती खरी ठरली. कसब्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दीड टक्के मतदान कमी झाले. नुकत्याच विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफूटवर यावं लागल्याने, त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतले बारकावे आणि इथल्या मतदारांमधील कल तसेच दिग्गजांची घेतलेल्या सभा यामुळं मोठ्या प्रमाणात मतदान होईल असं बोललं जात होतं. पण तसे चित्र काही दिसून आलेले नाही.

  कोण  बनणार नायक ..?

कसबा हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. तसेच येथे "अनेक वर्षापासून ब्राह्मण उमेदवार दिला जातो. पण यावेळ मुक्ता टिळकांच्या नातेवाईकांना डावलल्यामुळं किंवा ब्राह्मण समाजातील उमेदवार नसल्यामुळं ब्राह्मण समजाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं त्याचा फटका भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना जोरदार लढत देतील, त्यामुळं कसब्यात जिंकण्याची संधी दोन्ही उमेदवारांना आहे, अगदी थोड्याफार फरकाने म्हणजे चार ते पाच हजार मतांच्या फरकाने उमेदवार जिंकू शकतो", असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

 कसब्यात मतांचे वर्गीकरण..?

दरम्यान, कसब्यात एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 36 हजार 984 पुरुष तर 1 लाख 38 हजार 690 महिला मतदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 51.54 टक्के इतकं मतदान झालं होतं. तसंच कसब्यात अठरापगड जातींचे नागरिक आहेत, ब्राह्मण समाजाची नाराजी आणि त्यांनी न केलेले मतदान हे मविआच्या रविंद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मागील निवडणुकांचा विचार केल्यास कसब्यात भाजपला सरासारी 63 हजार ते 64 हजार मतं मिळाले आहेत. काँग्रेसला 43 हजार - 45 हजार मतं मिळतात. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मनसेला सरासरी 27 हजार मतं मिळाली.

चिंचवड मध्ये काय होणार...?

दुसरीकडे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे तर भाजपा अश्विनी जगताप यांच्यात देखील अटतटीत लढत होणार आहे. चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना सहानुभूतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकेल, असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. दोन्ही ठिकाणी प्रचारात दिग्गजांनी हजेरी लावली. चार चार दिवस तळ ठोकून होते. त्यामुळं पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेय. कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचारासाठी मोठे मोठे रोड शो झाले. तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची फौजही कामाला लागली होती. त्यामुळं येथे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post