नुकताच जामिनावर सुटला परत लाखांची चोरी प्रकरणात जेरबंद .प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गुन्ह्याच्या शिक्षेतून जामिनावर कारागृहातून सुटला असताना त्याने पुन्हा लाखांची चोरी केली आणि पोलिसांनी काही तासात त्याला पुन्हा मुद्देमालासह ताब्यात घेतलं. मंगळवार पेठेतील वात्सल्य नर्सिंग होममधून दागिने आणि रोकड असलेली पर्स चोरी करणाऱ्या एकाला जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलंय. संतोष जाधव असे त्याचे नाव असून त्यांच्याकडून 1 लाख 88 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी पत्रकार बैठकीत दिलीय.

पोलिसांनी त्याच्याकडून 2 सोंन्याची मंगळसूत्र,अंगठी,कर्णफुले आणि अडीच हजाराची रोकड असा सुमारे 1 लाख 88 हजार 530 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय.संबंधीत आरोपीवर शाहूपुरीसह अन्य पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.आरोपी यापूर्वीच्या गुन्ह्याच्या शिक्षेतून जामिनावर मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी कारागृहातून सुटला होता. त्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्याने चोरी केली आणि जुना राजवाडा पोलिसांनी काही तासात जेरबंद करीत मुद्देमाल जप्त केलाय. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, परशुराम गुजरे,सतीश बांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, प्रीतम मिठरी, अमर पाटील, योगेश गोसावी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे यांनी कारवाई केलीय.

Post a Comment

Previous Post Next Post