संजय राऊत यांच्या विरुद्ध याचिकेवरील सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : संजय राऊत यांच्या जामिनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकराणात काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता.मात्र त्यांच्या जामीनाला ईडीचा विरोध होता. इडीने संजय राऊत यांच्या जामिना विरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र आता ईडीची ही आव्हान याचिका देखील फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यानंतर आता न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांनीही या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

सुनावणीस नकार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. मात्र या जामिनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने संजय राऊत यांच्या जामिना विरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. प्रथम न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नॉट बीफोर मी म्हणत ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांनीही या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. यामुळे संजय राऊत यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post