कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या निषेर्धात कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात तिरडी मोर्चा काढण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई याने सांगली जिल्ह्यातील जत कर्नाटकात सामील करून घेण्याविषयी केलेल्या वक्तत्व्याच्या निषेर्धात आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात तिरडी मोर्चा काढण्यात आला.तसेच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बस आडवून काळ्या शाईने 'जय महाराष्ट्र' असे लिहून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे काळी काळ वातावरण तणावपुर्ण बनले.

शिवसेनेच्यावतीने प्रथम दसरा चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निर्षेर्धात ट्रेझरी रस्ते ते दसरा चौक असा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी तिरडी मोर्चातील बोम्मई यांचा पुतळा आंदोलकांकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे यांनी केले. यावेळी युवासेना पदाधिकारी मंजित माने, महिला आघाडी प्रमुख स्मिता सावंत, वैभव जाधव, अवधेश कसबे, विराज पाटील, विशाल देवकुळे, अभिजीत बुकशेट आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post