मुंबई - आझाद मैदानावरील आंदोलनालास सुरूवात

 महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने विविध मांगणीसाठी आंदोलन करीत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

  (अब्दुल कय्यूम ) :

 मुंबई  : दि. १० ऑक्टोबर २०२ २मुंबई - आझाद मैदानावरील आंदोलनालास सुरूवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने विविध मांगणीसाठी आंदोलन करीत आहे.सरकारचे लक्षवेधण्यासाठी तसेच १६ वर्षापासून प्रलबिंत मांगणीसाठी हे आंदोलन आहे. असे संघटनेचे अध्यक्ष जायभाय यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने १६ वर्षापासून प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळत नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलनाची भुमिका घेतली आहे, त्यानुसार १० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे आंदोलनासाठी संघटनेचे पदाधिकारी, सभासद रवाना आझाद मैदानावर महावितरणचे विविध परीमंडळातील शेकडो यंत्रचालक आंदोलन करीत आहे. यात प्रामुख्याने औरंगाबाद, नांदेड, लातुर, बारामती, पुणे, कोल्हापूर, चंद्रपुर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, भांडुप आदी परीमंडळातील यंत्रचालक कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनलास सुरूवात झालेली आहे. माहिती संघटनेचे अध्यक्ष श्री. सुधाकर जायभाये यांनी दिली आहे.

          या अंदोलनावर वीज उद्योगातील सर्वच कर्मचारी यांचे लक्ष असून उद्योगात कार्यरत अनेक संघटनांनी या अंदोलनास सक्रीय पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती सरचिटणीस नवनाथ पवार यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post