प्रेस मीडिया लाईव्ह :
जशी शहर वाढत गेली तशी लोकसंख्या वाढली आणि त्या सोबत वाढली कचऱ्याची समस्या आणि शहरात कचऱ्याचे ढीग उभे राहू लागले त्या मुळे मोकाट जनावरांचा त्रास सुरू झाला आणि यावर कोणतीही उपयोजना पालिकेकडे नव्हती
पालिका प्रशासन नेहमीच या बाबतीत आपली अनास्था दाखवत आलीच आहे आणि आता ही दाखवतेच आहे यावर प्रत्युत्तर म्हणून हीच बाब रविराज काळे यांनी हेरली आणि विचार सुरू झाला हे कस सुधारता येईल आणि जन्म झाला कचऱ्यातून सेल्फी पॉईंट या संकल्पनेचा शहरातील कचऱ्याचे ढीग बाजूला सारून तेथील जागा व्यवस्थित रंग रांगोटी करून तिथे सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले
याची सुरुवात पिंपळे निलख बस स्टॉप च्या मागे असलेल्या कचऱ्याचा ढीग साफ करून करण्यात आली आणि या नव्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सत्यात उतरवन्यात यश आले ..या वेळी रविराज काळे म्हणाले की समस्या येत राहणार त्यावर उपयोजना कशी करता येईल आणि ती अधिक अधिक सुंदर पने कशी राबवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे ..