श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर येथे कोजागिरी रासउत्सव साजरी, "कच्छ श्री नर नारायण देव युवक युवती मंडळ खांदा कॉलनी यांचे नियोजन"प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जे एम म्हात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून "श्री क्षेत्र पंचायतन मंदिराची" स्थापना नढाळ चौक येथे करण्यात आली. या मंदिर परिसरात स्थापनेपासून विविध धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ठाणे,नवी मुंबई, रायगड परिसरातील भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढत चालला आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले होते.

        कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला  कच्छ  श्री नर नारायण देव युवक युवती मंडळ खांदा कॉलनी यांच्या नियोजनाखाली एकदिवसीय रास उत्सव आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई ,ठाणे , रायगड परिसरातील सर्व स्वामीनारायण संप्रदायाचे सत्संगी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. श्री परमहंसदास स्वामी, श्री अक्षर प्रकाशदास स्वामी, श्री विज्ञान स्वरूपदास स्वामी आदी संत मंडळी कच्छ भुज येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथून  या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजार पेक्षा जास्त बांधवांची उपस्थिती होती. यावेळी सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रमाचे मंदिर परिसरामध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाप्रसाद, रास गरबा उत्सव, उपस्थित संत मंडळींचे दर्शन सोहळा अशा प्रकारे धार्मिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक आणि पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री जे.एम.म्हात्रे साहेबांनी उपस्थित राहून परमहंस स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि उपस्थित बांधवांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post