'जात प्रमाणपत्र वाटप करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी' विषयावर कार्यशाळेचे आयोजनप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर  (जिमाका): जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार (संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी) यांच्यासाठी दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 'जात प्रमाणपत्र वाटप करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी' या विषयावर प्रशिक्षण/कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी कळविले आहे.

 सदर कार्यशाळा जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे.


Post a Comment

Previous Post Next Post